इंग्लंड (वृत्तसंस्था) इंग्लंडमधील कॅटमधून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका इलेक्ट्रिशियनने १०० हून अधिक महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. तसेच अभद्र कृत्य करून दोन महिलांची हत्या केली. आरोपीवर गुन्हा यापूर्वीच सिद्ध झाला होता. आता न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
‘एका इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, दोषी इलेक्ट्रिशियन फुलरला ‘बेडसिट किलर’ म्हणूनही ओळखले जाते. दोन महिलांची हत्या करून ३३ वर्षे तो पोलिसांपासून दूर राहिला. घटनास्थळी फुलरचा डीएनए सापडल्याने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. फुलर केंटमधील रुग्णालयाच्या शवागारात इलेक्ट्रिशियन होता. शवागारात काम करत असताना त्याने १०० हून अधिक महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. वर्षानुवर्षे फुलरच्या घृणास्पद कृत्याबद्दल कोणालाही माहिती नाही. कारण, तो आपली हौस भागवण्यासाठी बराच वेळ हॉस्पिटलमध्ये राहून काम करण्याचे नाटक करत असे. रुग्णालयातील सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर तो मृतदेहांशी संबंध ठेवायचा आणि व्हिडिओही तयार करायचा.
‘हैवान’ फुलरने १२ वर्षे शवागृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. अहवालानुसार, फुलर १९८९ पासून हेथफील्ड हॉस्पिटलच्या शवागारात मृत महिलांना आपल्या वासनेचा शिकार करत असे. या प्रकरणात, तपासकर्त्यांनी १०२ पीडितांचा उल्लेख केला आहे, ज्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर दोषी फुलरबाबत किमान २०० जणांनी पोलिस हेल्पलाइनवर फोन केला. १९८७ मध्ये दोन महिलांची हत्या करणाऱ्या फुलरच्या गुन्ह्यांचे सत्य त्याच्या डीएनए चाचणीनंतर समोर आले. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर फुलरचे सर्व गुन्हे एका मागोमाग उघड झाले. शेवटी, फुलरने स्वत: त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. सुमारे शंभर महिलांच्या मृतदेहासोबत त्याने घृणास्पद कृत्य केल्याची कबुली दिली होती.
काही काळानंतर, २०११ मध्ये, फुलरला पुन्हा अटक करण्यात आली आणि एकूण ५१ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला. दोन्ही शवगृहांमध्ये ७८ मृतदेहांची ओळख पटली, ज्यावर फुलरने बलात्कार केला होता. एवढेच नाही तर झड़तीदरम्यान फुलरच्या घरातून अश्लील छायाचित्रे, मृतदेहासोबतचे अश्लील व्हिडिओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवले आहे. लवकरच त्याला शिक्षा होईल.