धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये धरणगावचे दानशूर उद्योजक जीवन अप्पा बयस यांच्या स्व. ज्योतीदेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनतर्फे गरजू,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे हे होते.त्यांनी उद्योजक श्री.जीवन अप्पा बयस यांच्या दातृत्व आणि कर्तृत्वाबद्दल आभाराची भावना व्यक्त करून त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे कौतुक केले. गेल्या वर्षी फाऊंडेशनने खेड्यावरून येणाऱ्या दोन विद्यार्थ्यिनींना सायकल वाटप केले होते तर दहावीच्या गरीब विद्यार्थ्यांची परीक्षा फी सुद्धा भरली होती.
यावर्षी तीस विद्यार्थ्यांना अर्धा डझन वह्यांचा सेट आणि पेन फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवनअप्पा बयस आणि पदाधिकारी तेजेंद्र चंदेल, मुकेश बयस, प्रवीण पाटील, धीरेंद्र पुरभे, जितेंद्र बयस, मोहनीश चंदेल, निलेश बयस, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, यांच्या पर्यवेक्षक कैलास वाघ,ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, उमाकांत बोरसे, व्ही.एच.चौधरी आणि एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बेलदार यांनी केले.यावेळी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.












