धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या जन्मदिनानिमित्त धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे हे होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, ग्रंथालय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस अरविंद देवरे, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, माजी नगरसेवक निलेश चौधरी, युवा कार्यकर्ते गोपाल पाटील, सिताराम मराठे, संभाजी कंखरे, सागर बाजपेयी, आनंद पाटील, सागर भामरे, नारायण चौधरी, भुषण पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले.