अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हा मिडियाप्रमुख तथा सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच मुक्तार पटेल, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी, उपसरपंच माया महाजन, प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, भरत चौधरी, पराग महाजन, अलकाताई महाजन, कमलताई महाजन, सिद्दीक पटेल, रोहीत अडकमोल, प्रवीण अडकमोल, मुद्दसर पटेल, भिका पटेल, आरिफ तडवी, समीर तडवी, किसन तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.