धरणगाव (प्रतिनिधी) गुलाबरावजी पाटील साहेब फाउंडेशन यांच्या सहकाराने धरणगाव शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम धरणगाव शहरात दिनांक 6 रोजी संपन्न शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालय परा विद्यालय या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रतापराव पाटील जि प सदस्य यांनी सांगितले मंत्री महोदयांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक वर्षापासून मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे यावर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना विठुरायाच्या दर्शन होण्यासाठी बसेस मधून त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणे व घेऊन येणे असा उपक्रम राबवण्यात आला यावर्षी कीर्तनकार असतील वारकरी असतील दिव्यांग बांधव असतील अनाथ मुलं असतील या सर्वांना गरजेनुसार मोफत साहित्य वाटप करण्यात आले तसेच दरवर्षी धरणगाव तालुक्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला एक लाख रुपयाची स्कुटी देण्यात येते.
या प्रसंगी प्राध्यापक रमेश महाजन अर्बन बँकेचे संचालक काना शेठ इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव सी के पाटील,मुख्याध्यापका सुरेखा पाटील,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन,परा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिरसाट मॅडम, डी एस पाटील सर,शिवसेना परिवाराचे पप्पू भावे,कैलास माळी सर,परमेश्वर रोकडे सर, विलास महाजन,जीवन पाटील सर,एस एस पाटील सर,शिरसाट सर,ए एस पाटील,डी एन पाटील,एन बी पाटील,शिरीष आप्पा बयस,दिलीप महाजन,कन्हैया रायपूरकर,पापा वाघरे,वाल्मीक पाटील,तोसिफ पटेल,बाळासाहेब जाधव,रवींद्र जाधव,सोनू महाजन,बुटया पाटील,सुरेश महाजन,कमलेश बोरसे,नंदकिशोर पाटील,संजय चौधरी,सद्दाम हुसेन शिवसेना परिवारातील सर्व मान्यवर उपस्थित होते.