धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त व बलिप्रतिपदा पाडवा याचे औचित्य साधून बिलखेडे गावातील युवासेनेचे शाखाप्रमुख गोपाल भदाणे यांनी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तसेच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिलखेडे गावातील ८८ शेतकऱ्यांसाठी अल्प दरात मक्का, ज्वारी, दादर इ. प्रकारचे बियाणे उपलब्ध करून वाटप केले.
तसेच ४० जैविक शेती प्रमाणपत्र शेतकऱ्यांना वाटप केले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पं.स. सभापती दीपक भाऊ सोनवणे, भाऊसाहेब भदाणे, देविदास भदाणे, दिपक भदाणे, डॉ. सदिप भदाणे, ग्रा पं सदस्य दिनकर बाप्पू भदाणे, तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, ग्रा पं सदस्य डिगंबर सोनवणे, ग्रा पं सदस्य आखडू बाबूराव भिल, तसेच युवासेना शाखा क्र १ व युवासेना शाखा क्र १ आणि शिवसेना शाखा बिलखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश्वर भदाणे यांनी केले.