जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी महिला राखीव मतदार संघातून अरुणा दिलीपराव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
यावेळी डी जी पाटील, संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजू महाजन, नगरसेवक वासू चौधरी, चंदन पाटील, चारुशीला पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केल्यानंतर प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या सोभाग्यवतीनी अर्ज दाखल केल्यामुळे कॉंग्रेसने एकप्रकारे स्पष्ट संदेश दिलेला दिसून येत आहे.