जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून खासदार रक्षाताई खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष करणं पवार, शिवसेनेकडून महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे – खेवलकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
भाजप खासदार रक्षताई खडसे यांचे २ उमेदवारी अर्ज दाखल
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी आहे. त्यानंतर आता भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजप खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हा बँक निवडणुकीकरीता भाजपकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
रोहिणी खडसे यांचे २ उमेदवारी अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांनी एक महिला राखीव मतदारसंघातून आणि दुसरा मुक्ताईनगर तालुक्यातून असे २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष करणं पवारांचेही उमेदवारी अर्ज
भाजपकडून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार यांनी अनुक्रमे सर्वसाधारण आणि ओबीसी पुरुष राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आ. संजय सावकारे, अशोक कांडेलकर, नंदु महाजन सह त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती. पारंपारिक पद्धतीने चालणारा जिल्हा बँकेचा कारभार काळसुसंगत व्हावा म्हणून मोठ्या सुधारणांची गरज आहे, असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, तर माझ्या सारख्या तरुणांवर विश्वास दाखवून अशा सुधारणांची जबाबदारी द्यावी आणि आमदार गिरीश महाजन यांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार मी सार्थ ठरविण असे पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार यांनी सांगितले.
महापौर जयश्री महाजन यांचाही उमेदवारी अर्ज
जिल्हा बँकेसाठी निवडणूकीसाठी शिवसेनेकडून महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव तालुका विकासगट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.
आमदार गिरीश महाजन यांचाही उमेदवारी अर्ज
भाजपनेते व आमदार गिरीश महाजन यांचे सूचक जे के चव्हाण, अनुमोदक जामनेरचे उपनगराध्यक्ष शरद पाटील यांनी जामनेर सोसायटी मतदारसंघातून महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस नवल पाटील, तुकाराम निकम, सुभाष वाघुळदे, पितांबर भावसार यांच्यासह त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.