जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू आहे. यात शेतकरी विकास पॅनलमधील महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील यांनी सहकार पॅनलच्या महिला प्रवर्गातील उमेदवारी रोहिणी खडसे-खेवलकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, प्रा.डॉ.सुनिल नेवे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, राजु माळी, विलास धायडे, किरण कोलते, बोधराज चौधरी, बापु महाजन, शफी पेहलवान, एजाज खान, उसामा रउफ खान, अखिल चौधरी, सुमित ब-हाटे, व पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
















