TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोविडमुळे अनाथ झालेल्यांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना तसेच एकल/विधवा महिलांना शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बॅकेचे जिल्हा समन्वयक अरुण प्रकाश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे उल्हास पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक ठाकूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी‍ विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना जाहिर केली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना आवश्यक ते लाभ देण्याची कार्यवाही सर्व संबंधित विभागांनी तातडीने करावी. त्याचबरोबर अनाथ बालके व विधवा महिलांना कुटूंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचा लाभ, बँक खाते उघडणे, आधारकार्ड, जन्म,मृत्यु दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ताविषयक हक्क मिळवून देण्यासाठी मदत करणे, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ, घरकुल आदि योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती मदत सर्व संबंधित विभागांनी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांना दिलेत.

अनाथ बालके व विधवा महिलाना मदतीसाठी जिल्ह्यातील दानशूर, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील भरारी फाऊंडेशनने १३ अनाथ मुलांना प्रत्येकी ५ हजार रुपये, शैक्षणिक किट व एका महिलेस किराणा दिला. गार्डियन फाऊंडेशनने एका मुलास १२ हजार ५०० रुपये तर एका मुलीस ११ हजार रुपये शैक्षणिक फी दिली. लोकसमन्वय प्रतिष्ठानने २ मुलांना फी माफी करून देणेसाठी मदत केली. मौलाना आजाद फाऊंडेशनने 3 विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. तर साने गुरूजी फाऊंडेशनने १ अनाथ बालकास शैक्षणिक किट व १ विधवा महिलेस २ हजार रुपये व रक्षाबंधनानिमित्त साडी भेट दिल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी बैठकीत दिली.

तसेच सध्या जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २० असून या बालकांना सांभाळण्यास नातेवाईकांना बाल कल्याण समितीने परवानगी दिली आहे. तर एक पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांची संख्या ६०० तर १८ वर्षावरील बालकांची संख्या ६० इतकी आहेत. बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या ३०२ आहेत. तर कोरोनामुळे विधवा झालेल्या २८५ महिलांची माहिती प्राप्त झाली असून त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यादी तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या २० बालकांचे नावे ५ लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. या बालकांना पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी प्रस्ताव पुरवठा अधिकारी यांचेकडे देण्यात आला आहे. या बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी विभागीय कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला असून या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन स्किम अतंर्गत लाभ मिळण्यसाठी आवश्यक कार्यवाही सुरु असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group