TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत कोविड-१९ विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अद्याप ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोगय यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्ह्यात कोविड-१९ लसीचे अडीच लाख डोस आलेले आहेत. आगामी काळात आणखी ४ लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-१९ लसीकरण मोहीमेस वेग देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी ८ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोगय यंत्रणेने लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, धार्मिक स्थळे, मंदिरे आदि ठिकाणी लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार नागरीकांनी पहिला डोस तर ६ लाख ६ हजार नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्या नागरीकांना पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. यामुळे कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत असताना जिल्ह्यातील एकही पात्र नागरीक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात.

प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आणि सूक्ष्म नियोजन करावे. केंद्रातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करावे. याशिवाय प्रत्येक गावाच्या लसीकरणासाठी पथके निश्चित करावीत. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना पहिला डोस प्राधान्याने द्यावा. लसीकरणासाठी आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टरांची मदत घ्यावी. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणी बोलावणे, त्यांची बैठक व्यवस्था आदींची व्यवस्था अन्य विभागाच्या सहकार्याने करावी. याच प्रमाणे नागरी भागात ही नियोजन करावे. उपलब्ध लससाठ्यानुसार पुढील तीन- तीन दिवसांचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पुढील लस पुरवठा होईल. त्यानुसार नियोजन करावे.

आगामी सण, उत्सवाचे दिवस लक्षात घेता जिल्ह्यातील व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, कामगार यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे. लसीकरण झालेले नसताना कामगार कामावर ठेवला असेल तर अशा व्यावसायिकांवर कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय शासकीय व निमशासकीय सेवेतील ज्या अधिकारी व कर्मचारी यांचे अद्याप लसीकरण झाले नसेल त्यांचे वेतन रोखण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सुतोवाचही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.

जिल्ह्यातील विविध सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानीही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी. तसेच त्या-त्या गावातील सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आशा वर्कर्स, पदाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याबरोबरच लसीकरणाबाबत आप-आपल्या गावातील ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

धरणगावचे डॉ. लीलाधर बोरसेंच्या सेवेस १७ वर्ष पूर्ण ; गुलाबराव वाघांनी दिल्या शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

April 14, 2022

चोपडा पालिका अधिकाऱ्याची चार वर्षांनी होणार चौकशी !

December 13, 2022

धक्कादायक : सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात कुजत !

November 30, 2021

नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर ‘त्यावेळी’ त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group