जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांना आज तक्रारदार सुशिक्षीत बेरोजगार तरुणाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांनी शासनाच्या पीएमईजीपी या योजनेअंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्याकामी प्रकरण अपलोड करून बँकेकडे पाठवण्याच्या मोबदल्यात प्रकल्प अधिकारी आनंद देवीदास विद्यासागर (वय ५० प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, रा. अजय कॉलनी, रिंग रोड, जळगाव. ता.जि.जळगाव, वर्ग-३) याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. मागणी केलेली रक्कम आज पंचासमक्ष स्विकारताच सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई
जळगाव अॅन्टीकरप्शन विभागाचे पोलिस उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सापळा पथकात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्धन चौधरी, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ. ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पो.कॉ. महेश सोमवंशी यांचा समावेश होता