जळगाव (प्रतिनिधी) आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस रक्तदान शिबिरचे आयोजन रेड प्लस बँक मध्ये पार पडला. जिल्हा पोलीस रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषद सीईओ बी एन पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर भारती सोनवणे, डॉ. मोईज़ देशपांडे, डॉ. मिनाज पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस दलातर्फे ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा पोलीस दलाचा अभिनंदन केला. पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पोलीस चौफेर रस्त्यावर होते. रक्तदान श्रेष्ठदान आहे. मी पोलीस दलाचे अभिनंदन करतो.