जळगाव (प्रतिनिधी) नेहरू युवा केंद्र व स्कूल गेम स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आयोजित सर्व विभागीय कराटे स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी ठरली. जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला बेस्ट अकॅडमी हा पुरस्कार मिळवून नाव लौकिक केले.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या जवळपास २५० खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. त्यात जळगावच्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमी मधील ४३ खेळाडूंनी देखील आपला सहभाग नोंदविला. तसेच बेस्ट मास्टर अवॉर्ड प्रथम क्रमांकची ट्रॉफी देखील मिळवून खेळाडूंनी आपल्या अकॅडमीचे नाव उंचावले.
विजयी स्पर्धक खालीलप्रमाणे
सुवर्णपदक विजेते प्रथम क्रमांक
1) ओमकार निकम
2) नितीश भोसले
3) समृद्धी परदेशी
4) चिन्मय लापसीया
5) श्रेयाससिंग परदेशी
6) साक्षी बाविस्कर
7) यश सनांन्से
8) स्पर्शजा नेमाडे
9) कोटीजा नेमाडे
10) निशान सोनोणे
11) प्रथमेश वाघ
12) गुंजन ब्राम्हणकर
13) रोहित ब्राम्हणकर
14) वेदांत हिरवाले
15) युगांशी महाजन
रजतपदक द्वितीय क्रमांक
1) पियुष तायडे
2) स्वरूप पाटील
3) पूर्वेश विधाते
4) अनमोल बालणी
5) दिग्वि पांडे
6) गार्गी सन्ननसे
7) आस्था तिवारी
8) गौरी पाटील
9) सृष्टी वानखेडे
10) रेवा झोपे
11) साक्षी तायडे
12) पारस बालानी
13) कौस्तुभ जंजाळे
14) कुणाल बाविस्कर
15) धिरेंद्र पाटील
16) ऋग्वेद देशमुख
17) प्राची पाटील
18) गौरी झोपे
19) खुशी भंगाळे
कांस्यपदक तृतीय क्रमांक
1) राम जाधव
2) आर्यन चव्हाण
3) आलीया शेख
4) माहीर पाटील
5) मानसी चौधरी
6) ईश्वरी गोसावी
7) श्रावणी शिंपी
8) विशाल पाटील
9) अनुष्का तिवारी
१५ सुवर्ण पदक, १९ रजत पदक व ९ कांस्यपदक अशी कमाई करून जिल्ह्याचे व पोलीस दलाचे नावलौकिक केले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी विजयी सर्व खेळाडूंचा सत्कार केला. या पुढेही पोलीस दलाच्या या खेळाडूंनी आपले कौशल्य असेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवावे, असे सर्व स्पर्धकांना प्रेरित केले व पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंना विजया बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक वेल्फेअर आंबदास मोरे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी विजयी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले.
तसेच वेल्फेअर कर्मचारी ए.एस.आय. गायकवाड एस.सी.देसले आदिंनी विजयी खेळाडूंचा उत्साह वाढून राष्ट्रीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम /जंजाळे व राजेंद्र जंजाळे तसेच महिला पोलीस स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे / महाजन व यांचे मार्गदर्शन लाभले. सहाय्यक प्रशिक्षक प्राजक्ता सोनवणे, सूर्यकांत अहिरे, तुषार टाक, स्वीटी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.