धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाज फाऊंडेशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांची नुकतीच निवड झाली होती. याबद्दल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आज श्री. पाटील यांचा सत्कार केला.
महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाळ कोल्हापूर यांनी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांची निवड करण्यात आली होती. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी श्री. पाटील यांचा सत्कार केला. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन,ता.उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, वासुदेव चौधरी, विजय महाजन, संजय चौधरी, भानुदास विसावे, रवींद्र जाधव, विलास महाजन, नंदू पाटील, बुटू पाटील ,जीतु धनगर, योगेश पी.पाटील, वाल्मीक पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.