जळगाव (प्रतिनिधी) दि. ८ मार्च, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय महसुल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सह मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण /१५२०/प्र.क्र.२४/लोदिकक्ष दि. २३ नोव्हेंबर, २०२० च्या परिपत्रकान्वये कोविड-१९ च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी व विभागीय लोकशाही दिनाचे आयोजनाबाबत कळविलेनुसार दि. ८ मार्च, २०२१ रोजी होणाऱ्या विभागीय लोकशाही दिनात अर्जदार यांचे अर्ज समक्ष, टपाल व ईमेलव्दारे स्विकारण्यात येणार आहे.
सद्यःस्थितीत कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या कार्यक्रमास कोणत्याही विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, आपले विभागाशी संबधीत अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करणेसाठी पाठविण्यात येईल, असे गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.