जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याचा दुसरा सोमवार, दिनांक 14 सप्टेंबर, 2020 या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.