नाशिक (वृत्तसंस्था) परिसरातील उपेंद्र नगर येथील शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला. दिव्या त्रिपाठी (वय ११, रा. जगताप नगर, उंटवाडी), असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
दिव्या त्रिपाठी उपेंद्र नगर येथील रुद्र द प्रॅक्टिकल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. मंगळवारी (दि. २५) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दिव्या शाळेत गेली. मात्र, वर्गात बसल्यानंतर पाच मिनिटांतच दिव्या चक्कर येऊन पडली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. असता, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दिव्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाची व हुशार विद्यार्थिनी असल्याने तिच्या अचानक मृत्यूमुळे शाळेत व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर साहायक फौजदार हरून शेख तपास करीत आहेत.