जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेला वाटचालीत मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली. भुजबळ, राज साहेब सेना सोडून गेले. तरीही सेना उभी राहिली, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सेनेच्या कार्याचा गौरव केला. आता तुमची युवासैनिकांची गरज आहे. केवळ कार्डावर छापण्यापुरती पदे घेऊ नका, तर तर जबाबदारी स्वीकारा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
शहरातील राजे संभाजी महाराज नाट्यगृहात युवा संवाद कार्यक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. युवानेते वरुण सरदेसाई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव म्हणाले, शिवसेनेला वाटचालीत मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली. भुजबळ, राज साहेब सेना सोडून गेले. तरीही सेना उभी राहिली. आता तुमची युवासैनिकांची गरज आहे. केवळ कार्डावर छापण्यापुरती पदे घेऊ नका, तर जबाबदारी स्वीकारा. हा काम करत नाही, तो करत नाही, असे म्हूण नका. तर तुम्ही काय केले, विचार करा, असे आवाहनही गुलाबराव पाटील यांनी केले.
युवासंपर्क दौरा सुरु करा – वरुण सरदेसाई
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वरुण सरदेसाई म्हणाले, मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून आपली सत्ता आहे, विरोधी पक्ष बदलत गेला.. संघर्ष होत गेला, तरीह संघटनाच्या बळावर आपण कायम आहोत. केवळ सत्ता आली म्हणून शांत बसून राहता येणार नाही. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानासाठी बाहेर पडले, तसा युवासंपर्क दौरा सुरु करुन संपर्क वाढवा.