जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या १५ शाळा हायटेक होणार असून यासाठीच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 12 कोटी 23 लक्ष 55 हजार 647 इतका निधी मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे. भौतिक सुविधांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला- मुलींकरता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्चुअल क्लासरूमची सुविधा व शाळेला संरक्षण भिंत या सुविधा मंजूर निधीतून होणार असल्याने शिक्षणातून मुलांचा शारीरिक , बौद्धिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे.
आदर्श मंजूर शाळा व निधी खालील प्रमाणे !
जळगाव तालुक्यातील पिलखेडा उच्च प्राथमिक शाळा (84 लक्ष 76 हजार), मुनिसिपल स्कुल नंबर 19 उच्च प्राथमिक शाळा (60 लक्ष 45 हजार), धरणगाव तालुक्यातील पाळधी उच्च प्राथमिक शाळा (45 लक्ष 65 हजार), मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी उच्च प्राथमिक शाळा (1 कोटी 97 लक्ष 72 हजार), जुने गावं उच्च प्राथमिक शाळा (2 कोटी 01लक्ष 54 हजार), अमळनेर तालुक्यातील गळखांब उच्च प्राथमिक शाळा (50 लक्ष 45 हजार), भडगाव तालुक्यातील टोणगाव, यशवंत नगर उच्च उर्दू प्राथमिक शाळा (45 लक्ष 65 हजार), भुसावळ तालुक्यातील सिद्धेश्वर – वरणगाव उच्च प्राथमिक शाळा ( 88 लक्ष 8 हजार) , बोदवड तालुक्यातील कोल्हाडी उच्च प्राथमिक शाळा 56 लक्ष 66 हजार), चाळीसगाव तालुक्यातील माळ शेवगे उच्च प्राथमिक शाळा (47 लक्ष 45 हजार), चोपडा तालुक्यातील गरताड उच्च प्राथमिक शाळा (70 लक्ष 45 हजार ), एरंडोल तालुक्यातील विखरण उच्च प्राथमिक शाळा (33 लक्ष 49 हजार), जामनेर तालुक्यातील उर्दू उच्च प्राथमिक शाळा तोंडापूर (60 लक्ष 16 हजार ), पाचोरा तालुक्यातील पुणगाव उच्च प्राथमिक शाळा (95 लक्ष 26 हजार) व पारोळा तालुक्यातील विचखेडे उच्च प्राथमिक शाळा (85 लक्ष 73 हजार) असे एकूण 15 शाळांच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 12 कोटी 23 लक्ष 55 हजार 647 इतका निधी मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्याचे प्रथामिकाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला होता.
विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना विविध सहशालेय उपक्रमात प्राविण्य मिळवून देण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळा आदर्श ठरतील अशी खात्री असून सदर आदर्श शाळांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
– पालकमंत्री गुलाबराव पाटील