धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत काठेवाडींनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत परिसरात अनेक वर्षापासून काठेवाडी आपली गाई म्हशी घेऊन ओपन प्लेस जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशन,तहसीलदार,प्रांत ऑफिस यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायत हद्दीत राहणारे ग्रामस्थ त्रस्त झाले असून या बाबत तक्रार केल्यास काठेवाडी ग्रामस्थांना दमदाटी करतात. नुकतेच एक सेवानिवृत्त जवान त्यांना समजायला गेले असता त्यांना सुद्धा त्यांनी शिवीगाळ केली. जो कोणी बोलायला गेला त्याला काठेवाडी दादागिरी दाखवतात.
अशा उर्मट व दादागिरी वाल्यांचे कायमचा बंदोबस्त करावा, या संदर्भात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रसंगी पी एम पाटील सर,गोविंदा पाटील,सरपंच धनराज सोनवणे,चंदन पाटील,पिंटू पवार,अरुण महाजन,टोनी महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.
















