जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर यांनी नुकतीच जळगावातील रेडलप्स ब्लड बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी संचालक एम. देशपांडे यांनी त्यांचे स्वागत करत ब्लड बँकची माहिती दिली.
रोहिणी खडसे खेवलकर यांनी महाराष्ट्रात रक्तसाठ्याचा तुडवडा असल्याच्या पार्श्वभूमिवर सामाजिक जाणीवेतून ही भेट दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आधीही डॉ. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिर झाले आहेत. रोहिणीताई ह्या सामाजिक उपक्रमांच्या सदैव पाठीशी उभ्या राहतात. याप्रसंगी डॉ. रोहिणी यांनी रेडपल्स ब्लड बँकेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. ब्लड बँकला रक्त साठयाच्या पुर्ततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.