धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी केला.
यावेळी डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत ‘आदर्श गाव’ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू व त्यास माझे सहकार्य राहील. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनसाठी ग्रामपंचायतीत मी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून येणाऱ्या काही दिवसांनी पाईपलाईन कामाचे भूमिपूजन देखील करू, असेही ठोस आश्वासन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी शुभेच्छा रुपी दिले.
याप्रसंगी बिनविरोध लोकनियुक्त सरपंच सविताताई सोनवणे,सदस्य मंगलाताई महाजन,शिलाताई देशमाने,शितलताई पवार,संभाजी सोनवणे,चंदन पाटील,शाम पाटील,मंदार चौधरी, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष अँड.संजयभाऊ महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन,जेष्ठ कार्यकर्ते धनराज सोनवणे,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख टोनी महाजन,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.