जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. तसेच विरोधी पक्षनेते पद देखील आहे. यामुळे त्यांनी हिंमत दाखवून वादग्रस्त व शहरवासियांवर बोजा ठरलेल्या वॉटरग्रेसच्या ठेक्याबाबत श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ट्विट करून केली आहे.
‘जळगाव महापालिका-वुई-टू’ या व्हाटसऍप ग्रुपमध्ये आज सकाळपासून वाद-विवाद झडत आहेत. यात दीपक कुमार गुप्ता यांनी शहरातील विविध भ्रष्टारांच्या प्रकरणावर भाष्य केले. याप्रसंगी त्यांनी वॉटरग्रेस प्रकरणात सर्वपक्षीय नगरसेवकांची चुप्पी ही अतिशय संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात असून त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद देखील आहे. यामुळे त्यांनी हिंमत दाखवून वॉटरग्रेसवर श्वेतपत्रीका काढावी अशी मागणी गुप्ता यांनी केली.
यानंतर दीपक कुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना कम्युनिकेशन यांना टॅग करून जळगाव महापालिकेत वॉटरग्रेसच्या ठेक्यावर श्वेतपत्रीका काढण्याची हिंमत दाखविण्याची मागणी केली आहे.