पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खु. येथे किरकोळ वादातून भाऊने भाऊवर विळ्याने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सुनील गोकुळ बडगुजर (वय ३२,रा.पिंप्री खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कैलास गोकुळ बडगुजर याने दि. ५ एप्रिल रोजी तू माझ्या मुलाला तुझे वडील दारु पिऊन पेट्रोल पंपाजवळ पडलेला आहे, असे का सांगितले?, असे विचारले. त्यावर सुनील बडगुजर यांनी तुझ्या मुलाची व माझी गाठभेट नाही, असे सांगितले. परंतू कैलास बडगुजर याने दारा समोर पडलेला विळा उचलुन डोक्यावर मारुन दुखापत केल्याचे सुनील बडगुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.