नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना काळात ऑनलाइन क्लास सामान्य झालं आहे (Online Classes). दरम्यान, एका शिक्षकाने ऑनलाइन क्लासदरम्यान मोठी चूक केली. जेव्हा वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरने वेगळाच व्हिडिओ झूम कॉल सुरू असताना चालू केला आणि तो विद्यार्थ्यांनीही पाहिला. हे पाहून विद्यार्थीही थक्क झाले. यानंतर शिक्षकाला आपली नोकरी गमवावी लागली.
एका वृत्तानुसार, युनिव्हर्सिटीतील हे प्रोफेसर झूम कॉलवरुन क्लास घेत होते. पहिल्या वर्षाच्या मुलांचा क्लास सुरू होता. लेक्चरमध्ये दोन प्रोफेसर आणि विद्यार्थी जॉईन झाले होते. बराच वेळ विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर प्रोफेसरने काही वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून चूक ही झाली की ब्रेक घेत असताना त्यांनी स्क्रीन प्रेजेन्टेशनचा ऑप्शनच बंद केला नाही आणि आपला कॅमेराही सुरूच ठेवला. ब्रेक घेताच त्यांनी एक अॅडल्ट साईट ओपन केली, यात अॅडल्ट कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ दिसू लागले. प्रेजेन्टेन्शन सुरूच राहिल्याने त्यांची स्क्रीन विद्यार्थ्यांना दिसत होती. हे सगळं पाहून विद्यार्थीही थक्क झाले.