TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निर्बंध काळात ९५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा मोफत लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून निर्बंध काळात जिल्ह्यात ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.

राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १ जानेवारी, २०२० रोजी घेतला. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात, जळगाव शहरात ही योजना सर्वप्रथम राबविण्यात आली. २६ जानेवारी, २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरूवातीस जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देणेत आले होते. त्यानंतर फेब्रुवारी, २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी इतका करण्यात आला. तर शासनाच्या २६ मार्च, २०२० च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पुर्ण नांव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिल, २०२१ पासुन विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दिडपटीने वाढवून दिला असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांना इष्टांक दिडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज ५ हजार १२५ थाळ्यांचे वितरण सुरू आहे.

शिवभोजन केंद्रात मिळणारी थाळी यापुर्वी दहा रूपयांना मिळत होती. जास्तीत जास्त गरीब व गरजूंना लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी मागील लॅाकडाऊन कालावधीपासुन शासनाने एका थाळीसाठी केवळ पाच रुपये किंमत ठेवली होती. आता विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरीब आणि गरजू दररोज घेत असून निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी घेतला आहे. तर राज्यात शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित झाल्यापासुन आजपावेतो १२ लाख ९५ हजार ४५० लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना पार्सल स्वरूपात जेवण देण्यात येत आहे. केंद्राचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा. लाभार्थींची संख्या वाढल्यास रांगा करून दोन ग्राहकात आवश्यक अंतर (किमान ६ फूट) ठेवावे. त्यानुसार जमिनीवर मार्किंग करणे, केंद्र चालक आणि केंद्रांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी आणि लाभार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून तशा सूचना जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्बध काळात जिल्ह्यातील गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना आहार पुरविणारी शिवभोजन थाळी योजना तारणहार ठरली असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुर्यवंशी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याने मराठा समाजाचे आरक्षण हुकले : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रकार उपक्रमशील शिक्षक यांनी दगडावर देवीचे सुंदर चित्र रेखाटले

October 3, 2022

जिल्ह्यात आज आढळले ४७ कोरोनाबाधित, २८ झाले बरे !

February 8, 2021

व्हॅक्सीन आलं तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 20, 2020

ध्वजावतरण करून जपला राष्ट्रध्वजाचा सन्मान ; धरणगाव तहसिलला दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group