TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

vijay waghmare by vijay waghmare
September 21, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून जळगाव शहरात या मंडळाची ओळख आहे. जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. अजिंक्य कमलाकर देसाई स्थापनेपासून या मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

समाजप्रबोधनासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भान जपत मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती साकारली आहे. ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होत असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यास मदत होते. श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि सनातन परंपरेनुसार व्हावे, तसेच विसर्जनानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये आणि निसर्गालाही कोणतीही हानी पोहोचू नये, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर आगमन आणि विसर्जन मिरवणूक

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘पिंप्राळ्याचा राजा’चा आगमन सोहळा आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आयोजित केली जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्यात येत असल्याने गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग असतो.

२५ वर्षांपासून समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रम

गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. तसेच कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य केले जाते.

प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. हिवाळ्यात ब्लँकेटचे तर दिवाळीच्या काळात गरजूंना फराळ आणि मिठाईचे वाटपही करण्यात येते.

याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्याने सहभाग राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातही भक्ती, परंपरा, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEco-friendly idol for ‘Pimpralyacha Raja’ in its silver jubilee year; 25-year tradition of social service continues.

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती

April 28, 2024

भुसावळात मुस्लीम बहुल भागात घाणीचे साम्राज्य ; तातडीने साफसफाई करण्याची मागणी

October 29, 2020

पोलीस स्थानकाच्या आवारातून वाळूचे डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

October 19, 2020

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी विधवा महिलांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय : डी. जी. पाटील

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group