धरणगाव (प्रतिनिधी) येथील उड्डाणपुलावर आयशरने ओमनी कारला धडक दिल्यामुळे एक जण जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आयसर गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, जितेंद्र दिलीप पाटील (रा. स्वामी समर्थ नगर, धरणगाव) हे २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मित्र जिवन भोई याच्यासोबत मारोती ओमनी कार क्रमांक (एमएच १९ एई २२०९) हिच्याने हॉटेल चंदन पॅलेस येथून बिलाचे पैसे घेऊन धरणगाव बस स्थानकाकडे परत येत होते. याचेवली समोरुन येणारी आयसर गाडी (क्र. जीजे १३ एटी ८३१९) हिच्यावरील चालक राजपाल दलसुखभाई रोजासरा (रा.गुजरात) याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवत पुढे चालणा-या मोटार सायकला ओव्हरटेक करीत असतांना ओमनीच्या ड्रायव्हर साईडला ठोस मारुन मित्र जिवन भोई याच्या डोक्यास व हातास गंभीर दुखापती झाली. तसेच ओमनी कारचे नुकसान देखील झाले. या प्रकरणी जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून आयसर गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.
















