TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-१९’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. हा सण शक्यतोवर घरी राहूनच साजरा करावा. मात्र, मिरवणूक काढावयाची झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एक ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी पेंडॉल बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पेंडॉलमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नमुन्यांचे पालन करावे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचनास परवानगी देण्यात येईल. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. त्याचे केबल टी.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी,

ईद ए मिलादनिमित्त मिरवणुकीच्या मार्गावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ तात्पुरत्या सबील (पाणपोई) लावण्यात येतात. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. तेथे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. तेथे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-१९ परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबवावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. या सूचनांच्या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला असतील.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेही अनुपालन करणे आवश्यक राहील. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

'बाळासाहेबांचं नाव उद्धव ठाकरेंनी बुडवलं' : साध्वी कांचन गिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात महिलेचा विनयभंग ; आरोग्य निरीक्षक, मुकादमासह तिघांविरुद्ध गुन्हा !

August 1, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ नोव्हेंबर २०२४ !

November 28, 2024

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना

September 13, 2020

शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत! उपमहापौर सुनील खडकेंनी केली नागरिकांशी चर्चा

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group