जळगाव (प्रतिनिधी) विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य अमित सिंग भाटिया समन्वयीका संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांनी विठूमाऊलीच्या प्रतिमेचे पूजन केले. संगीत शिक्षक स्वानंद देशमुख, स्वाती देशमुख यांनी माऊलींचे भजन व आरत्या सादर केल्या. रवींद्र भोईटे व गणेश देसले यांनी वाद्यांची साथ दिली. त्यानंतर माऊलींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली व सर्व शिक्षकांनी भजनावर पावली व फुगडी यांचा ठेका धरला सर्व माध्यमिक विभागातील विद्यार्थी झूम ॲपद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचा व्हिडिओ हा प्राथमिक विभागाच्या मुलांना व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख धीरज जावळे, रोहिणी बाविस्कर होते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
















