मुंबई (वृत्तसंस्था) लोकनेते तथा महसूल-कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी नाथाभाऊ मंत्री असतांना, दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकाकरीता औरंगाबाद येथे जमीन उप्लब्ध करुन दिलेली होती. तसेच त्या स्मारकाकरीता साधारण २५ कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिलेली होती. त्यानंतर नाथाभाऊंचे मंत्रीपद गेल्यावर दुर्दैवाने या स्मारकाकरीता निधी उप्लब्ध झाला नाही व प्रस्तावित स्मारकाची साधी वीट देखील रचण्यात आली नाही. येणाऱ्या १२ डीसेंबर रोजी असलेल्या मुंडे साहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सदरील स्मारकाकरीता निधी उप्लब्ध करुन द्यावा अशी मागणी केली. त्यावर उध्दव ठाकरे यांनी सकारत्मकता दर्शवली व येत्या काळात औरंगाबाद दौरा असल्यास स्वत: प्रस्तावित स्मारकाच्या ठीकाणी भेट देऊन पहाणी करेल असे आश्वासन दिले. तसेच जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बैरेज व बोदवड उपसा सिंचन योजनेकरीता केंद्रीय जल आयोगामार्फत मान्यता मिळाली असुन प्रकल्पांकरीता केंद्रामार्फत निधी देण्यात येणार आहे. पण त्याकरीता राज्यसरकार मार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव देण गरजेचे आहे. म्हणुन कैबिनेटच्या बैठकीत सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मांडुन केंद्राकडे पाठवावा अशी मागणी नाथाभाऊंनी केली. यावर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी योजनेकरीता राज्यसरकार तात्काळ प्रस्ताव तयार करुन लवकरच केंद्र सरकारकडे पाठवेल असे आश्वासित केले.