मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर आता मतमोजणी झाली असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे २७ मतांनी विजयी झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरु आहे. अखेर आज निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. काँग्रेसने भाजपच्या दोन मतांविरोधात आक्षेप नोंदवला आहे, त्यामुळे मतमोजणीला उशीर लागला. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांसाठी होणारी चुर्शीची निवडणूक असतानाच संपूर्ण जळगाव जिल्ह्याची ज्या निकालावर नज़र लागली होती. तो निकाल समोर आला आहे. तो म्हणजे एकनाथराव खडसे पुन्हा एकदा निडून आले आहेत.
विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार आणि मतं
भाजप
१. प्रविण दरेकर – 26
२. श्रीकांत भारतीय – 26
३. राम शिंदे – 26
४. उमा खापरे – 26
५. प्रसाद लाड – 26
शिवसेना
१. सचिन अहिर – 26
२. आमशा पाडवी – 26
राष्ट्रवादी काँग्रेस
१. रामराजे नाईक निंबाळकर – 26
२. एकनाथ खडसे – 27
काँग्रेस
१. चंद्रकांत हंडोरे – 26
२. भाई जगताप – 20