जळगाव (प्रतिनिधी) स्टेट बॅकेमध्ये काही व्याज व्यवस्थित मिळत नाही. मी सांगतो त्याठिकाणी गुंतवणूक करा सांगून वृद्ध व्यापाऱ्याची ३८ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँकेत कार्यरत एकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात विलास डोंगरलाल जैसवाल (वय ६९,धंदा खाजगी व्यापार, रा. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रसाद सोनार (पूर्ण नाव माहित नाही) आणि विपुल लखीचंद चौधरी (रा.चौधरी वाडा, धानोरे, अडावद ता. चोपडा) या दोघांनी ३० डिसेंबर २०१७-१८ च्या दरम्यान, या दोघांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवले. जळगाव स्टेट बँक शाखा महाबळ येथे कार्यरत असलेला प्रसाद सोनार याने विलास जैसवाल यांचा विश्वास संपादन केला आणि सांगितले की, स्टेट बॅकेमध्ये काही व्याज व्यवस्थित मिळत नाही. मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही पैशांची गुंतवणुक करा. त्यातून प्रतिमहा १० ते १५ टक्के मिळेल. त्यातून तुम्हाला प्रतिमहा ५ टक्के देऊ असे गुंतवणुकीचे आमीष दाखवून ३८ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणुक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि किशोर पवार हे करीत आहेत.