यावल (2 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून 60 वर्षीय वृद्ध महिला व तिच्या सुनेला एका दाम्पत्याने शिविगाळ करून मारहाण केली. धारदार लोखंडी पट्टीने महिलेच्या पायाजवळ वार करून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून मारहाण
कोळन्हावी, ता.यावल या गावातील रहिवासी आशाबाई प्रकाश इंगळे (60) ही वृध्द महिला व तिची सून यशोदा इंगळे या दोघांना जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रदीप उर्फ बबलू बाळू सोळुंके त्याची पत्नी निशा प्रदीप सोळुंके या दाम्पत्याने शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी धारदार पट्टीने महिलेच्या पायावर वार करून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.