TheClearNews.Com
Saturday, November 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाणी योजना व शेत रस्ते डांबरीकरणावर भर : ना. गुलाबराव पाटील

वडिलांसमोर प्रतापभाऊंनी केले पहिल्यांदा भाषण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माझ्या राजकीय वाटचालीच्या पहिल्या दिवसापासून झुरखेडा आणि परिसराचे ऋणानुबंध असून यातून उतराई होण्यासाठी दोन्ही गावांमधील विकासकामांना गती दिलेली आहे. आधीची पाणी पुरवठा योजना बंद करून तापी नदीवरून या दोन्ही गावांसाठी योजना मंजूर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा करून प्रत्येक गावासाठी महत्वाचे घटक असणार्‍या पाणी योजना आणि शेत रस्ते डांबरीकरणावर आपला प्रमुख भर राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील झुरखेडा आणि निमखेडा येथे सुमारे एक कोटी रूपयांच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झुरखेडा आणि निमखेडा येथे सुमारे १ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपुजन  करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, आत्मा कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील, पं.स. सदस्य मुकुंदराव नन्नवरे, सरपंच मंगलाबाई पाटील, रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर पाटील, रवींद्र पाटील, कांतीलाल चौधरी, डिगंबर चौधरी, शिवा मोतीराळे, संतोष पाटील, योगराज चौधरी,  सतीश चौधरी, ग्रामसेवक आर.आर. निळे, सुनील चौधरी, सोपान चौधरी, साहेबराव पाटील, दगडू पाटील, शाखा प्रमुख छोटू पाटील, मुख्याध्यापक आणि शिक्षिका व परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

या कामांचे झाले भूमिपुजन

ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये झुरखेडा आणि निमखेडा येथे प्रत्येकी २० लाखांच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपुजन झाले. यासोबत जि.प. शाळा दोन खोल्या बांधकाम (१७.५ लक्ष); परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे (३ लाख); गाव अंतर्गत कॉंक्रीटीकरण (६ लक्ष); भूमिगत गटर बांधकाम ( ८ लक्ष); आर.ओ. अर्थात जलशुध्दीकरण प्लांट ( ५ लक्ष ); झुरखेडा – सतखेडा रस्ता खडीकरण (१० लक्ष ) आणि साठवण बंधारा दुरूस्ती ३ लक्ष या कामांचा समावेश आहे. तर निमखेडा येथे आंगणवाडी बांधकाम (८.५ लक्ष); स्मशानभूमि दुरूस्ती (३ लक्ष ) या कामांचे भूमीजन करण्यात आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून झुरखेडा आणि निमखेडा गावांबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, पंचायत समिती सदस्य असल्यापासून १९८७ पासून हे गाव माझ्या पाठीशी सातत्याने उभे राहिले आहे. त्यांनी दिलेला विश्‍वास हा आपण कधीही तोडला नाही. खरं तर विश्‍वास संपादनातून साधलेला विकास हा कायमस्वरूपी असतो. याच प्रकारे दोन्ही गावकर्‍यांच्या ऋणातून उतराई होण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. झुरखेडा गावातील प्रेम हे बाजारात मिळण्यासारखे नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते पुढे म्हणाले की, झुरखेडा आणि निमखेडा येथील पाणी पुरवठा योजना जुन्या झाल्या असून त्यायोजना आहे त्या स्थितीत क्लोज करण्याचे निर्देश मी दिले आहेत. या दोन्ही गावांसाठी लवकरच नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झुरखेडा ते धार, झुरखेडा ते बोरखेडा या रस्त्यांच्या बळीकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. झुरखेडा ते वंजारी या रस्त्यावरील पुलाला मंजुरी देण्यात आली असून ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झुरखेडा ते खपाट आणि झुरखेडा ते धार या रस्त्यांसाठी भरीव तरतूद येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, अंगणवाडी बांधकाम व शाळा खोल्या बांधकाम दर्जेदार करा, याच्या क्वॉलिटीत कोणतीही तडजोड करता कामा नये असे ना. गुलाबराव पाटलांनी बजावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कांतीलाल पाटील यांनी केले.

वडिलांसमोर प्रतापभाऊंचे पहिलेच भाषण !

झुरखेडा आणि निमखेडा येथील कार्यक्रम हा एका बाबतीत ऐतिहासीक ठरला. पालकमंत्र्यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे आजवर आपले वडील असतांना कधीही व्यासपीठावर बसले नसून त्यांनीत्यांच्या समोर कधी भाषण देखील केले नाही. या कार्यक्रमातही ते श्रोत्यांमध्येच बसून होते. मात्र याप्रसंगी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या उपस्थितीत भाषण केले अन् उपस्थितांनी याला जोरदार प्रतिसाद देखील दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
Next Post

यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का ; कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संशयावरुन एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 30, 2020

LIC ची ‘डबल’ फायदा देणारी पॉलिसी माहितीये का? ; दररोज २६० रुपये गुंतवणूक अन् मिळवा २० लाख

January 10, 2022

बोदवड तालुक्यात विजपंपांच्या केबल चोरांचा सुळसुळाट !

February 19, 2024

प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाचा चॉपरने भोसकून खून

January 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group