अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात जळोद गावाच्या सरपंचपदी भारती शशिकांत साळुंखे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी कल्पना जवाहरलाल भोई यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोरे यांनी कामकाज पाहिले.
यावेळी बिनविरोध निवडुन आलेले सदस्य भारती सावळे, वत्सलाबाई भिल, कल्पना चौधरी, विलास देशमुख, बेबीबाई चौधरी, दीपक पारधी, मयुरी बाविस्कर उपस्थित होते. सदर निवडीच्या वेळेस गावातील यशवंतराव देशमुख, हरीश कोळी, अनिल साळुंखे, हिम्मत भोई, मुरलीधर चौधरी, रघुनाथ चौधरी, रघुनाथ धनगर, भास्कर कोळी, रमेश शिरसाठ, दीपक साळुंखे, पो पाटील अशोक शिरसाठ, संभाजी देशमुख, रावसाहेब देशमुख, नरेश चौधरी, शालीक साळुंखे, सुनील देशमुख, दीपक पाटील, धनंजय पाटील, सुरेश देशमुख, मिलिंद साळुंखे उपस्थित होते. त्यांच्या या निवडीनिमित्त आमदार अनिल पाटील, जि प सदस्य जयश्री पाटील, पं. स. सदस्य प्रविण पाटील यांनी अभिनंदन केले.