चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळंबा येथे पर बांधकामाचे रोजंदारीवर काम करत असताना शहरातील हमीद नगर रहिवासी येथील १५ वर्षीय तरुण मजुराचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मुकेश सुरेश शिंदे, असे मयत तरुणाचे नाव आहे.
मयत मुकेश हा घरची परिस्थिती बेताची असल्याने कमी वयातच बांधकामावर मजुरीने जात होता. मुकेश नेहमीप्रमाणे तालुक्यातील कोळंबा येथे मजुरीने कामाला गेला होता. परंतु घराच्या स्लॅबचे काम करत असताना वायरला धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला नातेवाईक व सहकाऱ्यांनी चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.