मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माहे एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्य वाटप करणे करीता पुरविण्यात आलेल्या धान्यातील शिल्लक मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी चिखलीच्या स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजाबराव सिताराम पाटील (रा. चिखली ता. मुक्ताईनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
यासंदर्भात पुरवठा अधिकारी ऋषिकेश तानाजी गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात चिखली ता. मुक्ताईनगर येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान क्रमांक २२ चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील यांना या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्य वाटप करणे करीता पुरविण्यात आले होते. त्यातील एकुण धान्यांपैकी शिल्लक असलेला १) गहु ७०.५१ क्विटल २) तांदुळ ३६.७६ क्विंटल, ३) दाळ ॥ ८.६९ क्विटल इतके धान्य शिल्लक न ठेवता शासकिय धान्याचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. तसेच स्व:ताच्या फायद्यासाठी परस्पर विल्हेवाट लावल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. राहुन खताळ हे करत आहेत.