पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती खात्यातून संस्थेची व बँकेची फसवणूक करून ५ लाख ६१ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच याबाबत फिर्याद दिली आहे.
सचिन भीमराव पाटील (वय ४२ रा. प्लॉट नं ३८, गट नं ५४/१ शिवकॉलनी जळगाव) हे नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १२ मे २०१८ ते २४ जून २०२१ दरम्यान संशयित आरोपी रतिलाल वना पाटील (वय ५६, प्लॉट नं ४८ शिवकॉलनी जळगाव), विलास दत्तात्रय नायर (वय ६०, रा. प्लॉट नं ५, प्रभुदेसाईनगर, युनिटी चेंबरच्या पुढे जळगाव) यांनी फसवणूक केली आहे. दोघं संशयित आरोपी यांच्या पत्नी संस्थेच्या अध्यक्ष तथा उपाध्यक्ष आहेत. दोघं संशयित आरोपी यांनी भारतीय स्टेट बँक शाखा शिवकॉलनी जळगाव येथे प्राचार्य व संस्था अध्यक्ष यांचे नावे असलेले संयुक्त खात्यात शासनाकडून प्राप्त होणा-या विदयार्थाच्या शिष्यवृत्ती खात्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य या तिन्ही पैकी कोणत्याही दोन व्यक्तीना संयुक्त व्यवहार करणे बाबत स्वाक्षरी बदल करणे बाबत संस्थेचा खोटा व बनावट ठराव तयार केला. त्यासाठी सोबत नकली कागदपत्रे जोडून सदर कागदपत्रे व ठराव बँकेत सादर केलेत. यानंतर प्राचार्य सचिन पाटील यांच्यामोबाईलवर signature athority has been changed असा मँसेज दि २२ मे २०१९ रोजी आला. त्यामुळे सचिन पाटील यांनी बँकेत जावुन तपास करीता बँकेत गेलेत. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, स्वाक्षरी नमुना कार्ड नविन न घेता जुन्याकार्डवरच वाइस प्रेसिडेन्स असा शिक्का मारुन संशयित आरोपी विलास नायर यांनी स्वाक्षरी केली. तर दोघा संशयित आरोपींनी बँकेचे अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे एकुण ५,६१०००/- (पाच लाख एकस्सठ्ठ हजार रुपये) रुपये संस्थेच्या बँक खात्यातून शासकीय रक्कम ट्रॉन्सफर करुन संगनमतांने स्व:ताच्या फायदयासाठी बँकेची व संस्थेचा विश्वासघात करुन खोटे दस्ताएवज तयार करुन अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि/जिभाऊ पाटील हे करीत आहेत.
















