धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समिती सभागृहात आज राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती सारख्या निवडणुकांसाठी पक्ष संघटन वाढवावे लागणार आहे. तसेच अजितदादा पवार यांचे विचार तळागळातील लोकांपर्यंत पोहचवायची आपण सर्वांची असल्याचेही आवाहन कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केले. तसेच आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी अध्यक्ष रमेश पाटील, प्रकाश ओंकार महाजन, सुरेखाताई माळी यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केले.
बैठकीला यांची होती उपस्थिती !
महिला राष्ट्रवादी माजी अध्यक्ष शोभाताई पाटील, कल्पनाताई पाटील, भुपेन्द्र पाटील, भवरखेडा माजी सरपंच शामकांत पाटील, दोनगाव माजी सरपंच आनंदा सिताराम पाटीलक किशोर अर्जुन पाटील, भोद खृ सरपंच विजय पाटील, बोरगाव खृ सरपंच दिनकर पाटील, गंगापुरी माजी सरपंच निंबा पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, बोरगाव विका सोसयटी चेअरमन माधव पाटील, नारणे उपसरपंच चांगो भिल्ल, रवि महाजन , ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र पाटील प्रल्हाद पाटील,पथराड , विजय माळी ,जगदीश जगताप, राजेंद्र पाटील बांभोरी कैलास सांळुखे, वाय डी पाटील, कपिल पाटील,साळवा,निलेशभदाणे बिलखेडा, गणेश पाटील, बापु सोनवणे,दिपक पाटील, पंढरीनाथ बोरसे सर कल्याणे होळी, अमोल पाटील,ज्ञानेश्वर पाटील कवठळ, प्रदिप रमेश एकनाथ पंढरीनाथ, भवरखेडा, रमण पवार भोद खृ , मुकेश पाटील, भानुदास मराठे, नाटु परदेशी, फकीरा पाटील, कडु मराठे, निलेश मराठे, सागर माळी हे उपस्थित होते. बैठक यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाटेश्वर पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.