TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील हातपंप/वीजपंप देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

पाणीपुरवठा गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती : विभागाचा ऐतिहासिक निर्णय !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४ या कालावधीतील शासनाकडे पाठपुरावा केला होता. तथापी ४६ वर्ष लढा देवुनही या कर्मचा-याना शासनाकडुन न्याय मिळालेला नव्हता. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्य पूर्वक ऐतिहासिक निर्णय घेवून राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील हातपंप/विजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गातील १०७४ कर्मचाऱ्यांच्या वेतन/निवृत्तीवेतनाचा खर्च रु. ४५.९१ कोटी चे शासनाने दायित्व स्वीकारण्या बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील १०७४ कर्मचाऱ्यांचा वेतन व भत्यांचा जिल्हा परिषदेवरील भार कमी होऊन सदरील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते जिल्हा परिषदेमार्फत वेळेवर अदा करणे शक्य होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऐतिहासिक निर्णयाद्वारे वचनपूर्ती केल्याने त्यांचे हातपंप व वीजपंप देखभाल दुरुद्ती कर्मचारी संघटना यांनी आभार मानले आहे.

जिल्हा देखभाल दुरुस्ती निधीकरीता शासनाकडून देण्यात येणारे अनुदान २०१७-१८ पासून बंद झाल्याने हातपंपा बरोबरच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविणे जिल्हा परिषदांना जिकरीचे झाले होते. जिल्हा परिषदांचे तुटपुंजे उत्पन्न, पर्यायाने पाणी पुरवठा प्रयोजनार्थ देखभाल दुरूस्ती निधीत जिल्हा परिषदांचे मर्यादित योगदान, सेवानिवृत्ती वेतन व वेतनावरील वाढीव खर्च, तुलनेत ग्रामपंचायतीकडून वसूल मर्यादित वर्गणी, वर्गणी वसूलीच्या मर्यादा यामुळे आकस्मिक पाणी पुरवठ्यामध्ये महत्वपूर्ण ठरणाऱ्या हातपंप/वीजपंप या उपाययोजनेकरिता कार्यरत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेकडून वेतन ६-६ महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग व मा. आयुक्त भु.स.वि.यं. ग्राम विकास सचीव ,अर्थ विभाग सह सचीव यांच्या वेळोवेळी बैठका घेवुन सतत संबंधीत विषयाचा पाठपुरावा करुन प्रस्ताव मार्गी लावला. मुख्यमत्री एकनाथजी शिंदे,वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्याकडे सदर विषय गांभीर्याने मांडला. त्याला आज मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील हातपंप/विजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी नियमित २३७ व ८३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन/निवृत्तीवेतनाचा खर्च रु. ४५.९१ कोटी चे दायित्व स्वीकारून शासनाकडुन कायमस्वरुपी अनुदान मंजुर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यातील ३४जिल्हा परिषदेमधील कार्यरत २३७ व सेवानिवृत्त व कुटुंब निवृतीधारक ८३७ एकुण १०७४ कर्मचा-यांना लाभ होणार आहे.

पाणीपुरवठा गुलाबराव पाटील यांची वचन पूर्तीने आम्ही भारावलो !

ना. गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री झाल्यानंतर हातंपप दुरुस्ती कर्मंचा-यांनी त्यांची भेट घेवुन वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली मागणी व कर्मचा-यांनी वेतन व सेवानिवृत्ती वेतना बाबतच्या हाल अपेष्टा याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व्यथा मांडली. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या हातपंप कर्मचा-यांची कामे जवळुन पाहीले आहे. तुमचा प्रस्ताव मंजूर करून तुम्हाला न्याय देणारच असे वाचन दिले होते. त्यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना कायम अनुदान देण्याबाबत दिलेले वचन पुरती आज होत असल्याने आम्ही राज्यातील हातंपप दुरुस्ती कर्मंचारी संघटना ना. गुलाबराव पाटील यांचे ऋण व्यक्त करीत असून याऐतिहासिक निर्णयामुळे आम्ही भारावलो आहोत.

एस.वाय शेख, अतुल कापडे/ एस. टी सूर्यवंशी / विष्णु बडगुजर/ सतीश महाजन
(राज्यस्तरीय हात पंप दुरुस्ती कर्मचारी संघटना पदाधिकारी )

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEmployees appointed for hand pump/electric pump maintenance repair in the state got justice after 46 years!gulabrao patil

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

राज्यातील हातपंप/वीजपंप देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नियोजनाअभावी जामठी गावात नागरी सुविधां विस्कळीत ; नागरिक नाराज !

October 12, 2022

मुक्ताईनगरात जबरी चोरी ; दाम्पत्याला अडवून रोकडसह सोन्याची पोत लांबविली !

April 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली

June 1, 2021

गायरान जमिनीवरील अतिक्रमण 24 तासात स्वतःहून काढा ; जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम !

November 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group