चेन्नई (वृत्तसंस्था) भारत विरुद्ध इंग्लंड ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात हा सामना खेळला जात आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये ५७८ धावांचा डोंगर केला आहे. रविचंद्रन अश्विनने जेम्स एंडरसनला आउट करुन इंग्लंडची इनिंग संपवली. तर भारतीय संघासमोर आता धावांचं मोठं आव्हान असणार आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दिसरा दिवस आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये ५७८ धावांचा डोंगर केला आहे. भारताकडून अश्विन आणि बुमराहला ३-३ विकेट मिळाल्या. तर, शाहबाज नदीम आणि इशांत शर्माने २-२ फलंदाजांना माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने नववी वेकेट LBW केली तर बाईस ३४ धावा करून माघारी परतला. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी तीन गडी बाद करण्यात यश आलं आहे. १८६ षटकांनंतर इंग्लंडने ९ गडी गमावत ५६७ धावा केल्या. लीच आणि जेम्स अँडरसन खेळत होते. मात्र ५७८ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परता आला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी आता ५७९ धावांची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता भारतीय संघ कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी आखून मैदानात खेळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. इशांत शर्मा चेन्नई कसोटीच्या दुसर्या दिवशी हॅटट्रिक करण्याची संधी गमावली. त्याने इंग्लंडला सलग 2 चेंडूत दोन झटके दिले. प्रथम त्याने जोस बटलरला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर जोफ्रा ऑर्चरला तंबूमध्ये पाठवले. इशांतने दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लीचने इशांतचा तिसरा चेंडू सहज टोलवला त्यामुळे इशांतची हॅट्रिक हुकली.
दुसरा दिवस रूटच्या नावे
कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नावे होता. भारतात द्विशतक झळकावणारा रूट मागील १० वर्षातील पहिला फलंदाज ठरला आहे. रूटने ३७७ बॉलमध्ये २१८ धावा काढल्या. यापुर्वी नोव्हेंबर, २०१० मध्ये न्यूजीलंडच्या ब्रँडन मॅकुलमने हैदराबाद टेस्टमध्ये २२५ धावा केल्या होत्या.
भारतचे प्लेइंग ११: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.
इंग्लंडचे प्लेइंग ११: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.
















