एरंडोल (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना शहरातील गांधलीपुरा, वखारीजवळील भागात सोमवार, १९ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हर्षदा किरण मराठे (27, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मृत विवाहितेचे तर किरण महादू मराठे (35), असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.
मराठे दांपत्य शहरातील गांधलीपुरा परिसरात वास्तव्यास होते. या दांपत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू होते. सोमवारी पुन्हा दोघांमध्ये वाद उफाळून आला. यावेळी संतापाच्या भरात संतप्त पतीन किरणने पत्नी हर्षदाच्या डोक्यात घरातील फरशी मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाला. या घटनेचे माहिती कळताच एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. तर संशयित पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.