जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल यांनी महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देऊन केली आहे.
विजय बांदल यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी नगर शाळा क्रमांक १ पटांगणात तत्कालीन जळगाव शहर नगरपालिकेकडून अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारून दिला होता. त्यावेळेस १९८६ साली पासून वारंवार नगरपालिकेकडे मागणी केल्यानंतर सन्मानीय जळगाव जिल्ह्याचे लाडके कलेक्टर श्री भास्करराव पाटील यांनी ताबडतोब आदेश देऊन नगरपालिकेकडून अर्धाकृती पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शिवाजी नगर मित्र मंडळाच्या प्रभावाने सन्मानीय नगराध्यक्ष असताना श्री सुरेशदादा जैन माजी मंत्री यांनी सहा महिन्यातच अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन करून सहा महिन्यात शिवाजीनगर वासियांना दिलेले वचन पूर्ण करून दाखविते तरी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळ्या ऐवजी अस्वास्थ पुतळा मान्य करावा व आता येणाऱ्या १९-२-२०२२ या तारखेला शिवाजीनगर वासियांची शिवजयंती उत्साहात साजरी करता यावी यासाठी तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण लवकरात लवकर करून द्यावे ही आपल्या अपेक्षा करतो. श्री महापौर साहेब आपणही असे धाडस दाखवून शिवाजीनगर वासियांची मन जिंकावे, असे यात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल, उप महानगरप्रमुख प्रवीण पटेल, शाखाप्रमुख गणेश देविदास सोनवणे, कार्यालय प्रमुख संजय सांगळे, गटप्रमुख विश्वास महागडे, समन्वयक अंकुश कोळी, शाखा संघटक विनोद वारे, समाजसेवक गणेश मोझर, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश व्यास, ज्येष्ठ शिवसैनिक शेषराव अप्पा वालकर, दीपक चौधरी, किरण सपकाळे, समीर खाटीक, संजय चित्ते आदी उपस्थित होते.