धरणगाव (प्रतिनिधी) निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांची भूमिपूजने केल्यावर निवडणुकीत मत मागता येते, असा पायंडा आहे. परंतु आता निवडणुका पुढे ढकलल्याने विकासकामे थांबवून ठेवणार नाही तर येणाऱ्या काळात आणखी भरघोस विकासकामे जळगाव ग्रामीण मतदारसंघात राज्याचे पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील आणणार असून तुम्ही कामांची मागणी करा, मंत्रीमहोदय निश्चितपणे ती पूर्ण करतील असा शब्द जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी सतखेडा वासीयांना दिला.
सतखेडा येथे पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून 5 लाखाच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन जिप सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी उप सरपंच गजानन धनसिंग पाटील ग्रामसेवक आप्पा दिलीप प्रल्हाद पाटील विश्वनाथ रामदास पाटील, मंगल तुंबडू पाटील, प्रभाकर सिताराम पाटील, मणिलाल नामदेव पाटील, विनायक भिका पाटील, बन्सीलाल मोहन पाटील, गंगाराम लक्ष्मण नन्नवरे, मोहन बाबुराव नन्नवरे, गोकुळ अर्जुन नन्नवरे, गौतम लहू नन्नवरे, अजय पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रताप पाटील, शैलेश पांडुरंग पाटील, दत्तू संतोष पाटील, जगन मुलचंद पाटील, विजय बळीराम, सुरेश गंगाधर पाटील पाटील भगवान सोनवणे, सुभाष गंगाधर पाटील, राहुल पाटील, विलास नन्नवरे, लखन पाटील, समाधान वानखेडे, पंकज पाटील कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.