नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की नवरी आपल्या लग्नाच्या दिवशीही कंट्रोल करू शकत नाही आणि पाणीपुरी पाहून लगेचच खाण्यासाठी तिथे पोहोचते. नवरीबाई एकटी जात नाही तर नवरदेवालाही आपल्यासोबत घेऊन जाते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी नवरीबाई दिसते. तुम्ही पाहू शकता की पाणीपुरी दिसताच नवरीबाई आपल्या नवरदेवाला घेऊन तिथे खाण्यासाठी पोहोचते. मात्र नाकातील नथीमुळे तिला पाणीपुरी खाता येत नाही. यानंतर ती आपल्या नवरदेवाला ही नथ बाजूला करण्यास सांगते. नवरदेवही आपल्या नवरीच्या आनंदासाठी तिचं ऐकतो. तो नथ बाजूला घेतो आणि यानंतर नवरीबाई पाणीपुरीच्या आस्वाद घेते.
हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर kamakshi.kiwi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही दया येईल. कारण नवरीबाई मजेत पाणीपुरी खाते आणि नवरदेव फक्त तिची नथ पकडण्याचं काम करतो. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर जवळपास ४ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.