धरणगाव (प्रतिनिधी) तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड आज 26 जून रोजी होत आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सभापती निवडीसंदर्भात सर्व अधिकार गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप-शिवसेना आणि संजय पवार गट अशा सर्वांना संधी दिली जाईल, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजप व संजय पवार गट सर्वांना संधी दिली जाईल. कोणावर अन्याय होणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर,मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, भाजपाचे शेखर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख गजानननाना पाटील, शिरीषआप्पा बयस,उपतालुका प्रमुख मोती आप्पा पाटील, भाजपा शहर प्रमुख दिलीपभाऊ महाजन, सचिव कन्हैया रायपूरकर, किशोर पाटील, चंदन पाटील, धारचे सुधाकर पाटील, नरेश पाटील, सुभाष पाटील (बांभोरी), आबाभाऊ महाजन तसेच सर्व मार्केट कमिटीचे निवडून आलेले संचालक उपस्थित होते. दरम्यान, आज सभापती, उपसभापती निवड ; कुणाला संधी मिळणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.