एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथील राधाकृष्ण मंदिर गल्लीत एका प्लॉटच्या मोकळ्या जागेत मृत अर्भक आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात महिलेविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील राधाकृष्ण मंदिर गल्लीत एका प्लॉटच्या मोकळ्या जागेत अज्ञात महिलेने स्वतःची ओळख लपवून ५ महिन्याचे मृत अर्भक फेकून दिले होते. हा प्रकार समोर येताच आडगावातील पोलीस पाटील नितीन लक्ष्मण भुसारी यांनी धाव घेतली. याबाबत पोलीस पाटील भुसारी यांनी पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी माहिती दिली. पोलीस पाटील नितीन भुसारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.