मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत प्रियकर आणि प्रेयसी संभोग (Physical Relation) करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला (Kurla Crime News) परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बेशूद्ध झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी सायन रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीनं त्याच्या प्रयेसीसोबत कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास चेक इन केलं होतं. हॉटेलमध्ये रुम बुक करताना आपण प्रेयसीसोबत असल्याचा दावा त्या प्रियकरानं केला होता. दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवताना असताना तिचा प्रियकर अचानक बेशूद्ध झाला. त्यानंतर त्याच्या प्रेयसीने तात्काळ रिसेप्शनला संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क करुन घडलेल्या प्रकाराबाबत सांगितंल. त्यावेळी कुर्ला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केलं.
परंतु, उपाचारापूर्वीच प्रियकराचा मृत्यू झाला असल्याचं घोषीत करण्यात आलं. त्यानंतर पुढील चौकशीसाठी मृत व्यक्तीसोबत असलेल्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. मृत पावलेला व्यक्ती एका खासगी कंपनीत काम करायचा. तो वरळी येथे राहत होता. शारिरीक संबंध ठेवताना त्याने मद्य प्राशन केलं होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध झाला. अशी माहिती त्या महिलेनं पोलिसांना दिली. तर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोदं केली आहे. मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याची माहिती मिळेल.